भालाफेक मध्ये भारताचं नाव जगप्रसिद्ध करणारे नीरज चोप्रा यांचा जीवनप्रवास : Neeraj Chopra biography in Marathi 2024

2021 टोकीयो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविणारे तसेच 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रजतपदक मिळविणारे भारताचे प्रसिद्ध भालाफेकपटू Neeraj Chopra माहिती मराठी मधून घेण्याचा प्रयत्न या लेखातून करणार आहोत. या लेखात नीरज चोप्रा यांचा बालपणापासून ऑलिम्पिक पदक मिळविण्यापर्यंतचा प्रवास बघणार आहोत. तसेच त्यांचे कुटुंब, शिक्षण, संपत्ती(नेटवर्थ) इ. माहिती घेणार आहोत.

नीरज चोप्रा हे भारतीय ऍथलीट भालाफेकपटू आहेत. त्यांनी 2021, 2024 ऑलिम्पिक मध्ये भारताला पदक मिळवून दिले आहे. त्यांनी जगातील महान भालाफेकपटूच्या यादीत स्थान निर्माण केले आहे. विनम्र असणाऱ्या नीरज चोप्रा हे शिस्तबद्ध राहून प्रचंड मेहनतीने स्वतःला प्रसिद्धीच्या आणि यशाच्या शिखरावर घेऊन गेले आहेत. त्यांचा हा सर्व प्रवास नीरज चोप्रा माहिती मराठी या लेखातून आपण घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया नीरज चोप्रा माहिती मराठी मधून

Neeraj Chopra Age

Neeraj Chopra biography in Marathi 2024

नीरज चोप्रा यांचा जन्म हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यातील खांद्रा या ठिकाणी शेतकरी कुटुंबात 24 डिसेंबर 1997 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सतीशकुमार तर आईचे नाव सरोजदेवी आहे. तसेच नीरज यांना दोन बहिणी आहेत. संगीता व सुमन अशी त्यांची नावे आहेत. शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या नीरज यांच्यावर लहानपणापासून पारंपरिक मूल्यांचे आणि प्रचंड मेहनतीचे संस्कार झाले. 

आज एक यशस्वी दिसणारे खेळाडू नीरज हे लहानपणी लठ्ठ (जाड ) होते. त्यांचे वजन वयाच्या 12 व्या वर्षी जवळपास 80 किलो होते. त्यांच्या वजनावरून त्यांना शाळेत अपमानाचा सामना करावा लागत होता. त्यामुळे त्यांनी वजन कमी करण्यासाठी कुटुंबाच्या सांगण्यावरून खेळाकडे, व्यायामाकडे वळण्याचा निर्णय घेतला. यातून त्यांची शरीरयष्टी संतुलित आणि निरोगी होत गेली. तसेच त्यांना भालाफेक खेळाची ओळख झाली. (नीरज चोप्रा माहिती मराठी)

Neeraj Chopra Match

खेळाबरोबर शिक्षणाचे महत्व माहिती असणारे नीरज हे पदवीधर आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे खांद्रा येथेच झाले. त्यानंतर दयानंद अँग्लो वेदिक हायस्कुल, चंदीगड येथून त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. तसेच खेळात करियर करण्यासाठी त्यांनी खेळावर संपूर्ण लक्ष केंद्रित करून कुरुक्षेत्र विद्यापीठातून दुरुस्थ अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन बी.ए. पदवी मिळविली. यातून नीरज यांना शिक्षणाचे असलेले महत्व अधोरेखित होते

लठ्ठपणाचा सामना करत असलेले 12-13 वर्षाचे नीरज वजन कमी करण्यासाठी पानिपत येथील व्यायाम शाळेत जात असत. व्यायामशाळे शेजारी शिवाजी स्टेडियम होते. या मैदानावर भालाफेकीचा सराव करणाऱ्या खेळाडूंना बघून नीरज भालाफेक खेळाकडे आकर्षित झाले. नीरज 13 वर्षांचे असताना 2010 मध्ये ताऊ देवी लाल क्रीडा संकुल येथे प्रशिक्षण घेण्यासाठी गेले. आणि भालाफेकीचा प्रवास सुरु झाला. त्यांच्या जीवनात भाला आला. हा एक योगायोग होता पण या योगाला संधीत रूपांतर करून त्यांचे सोने केले.

Neeraj Chopra Career

भालाफेकीचा प्रवास सुरु झाला. त्यांच्या जीवनात भाला आला. हा एक योगायोग होता पण या योगाला संधीत रूपांतर करून त्यांचे सोने केले.

1) राष्ट्रीय पातळीवरील कामगिरी 

भालाफेकीच्या कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय 40 मीटर पर्यंत भाला फेकण्याची नैसर्गिक प्रतिभा ओळखून भालाफेकपटू जयवीर सिंग यांनी नीरजला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. शालेय शिक्षण घेत असताना भालाफेक स्पर्धेत सहभाग घ्यायला सुरुवात केली. तालुका, जिल्हा पातळीवरील स्पर्धा जिंकत 2012 मध्ये लखनऊ येथे झालेल्या राष्ट्रीय ज्युनियर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत 68.40 मीटर भाला टाकून सुवर्ण पदकासह राष्ट्रीय रेकॉर्ड तयार केला.

तसेच 2013 साली झालेल्या राष्ट्रीय युवा स्पर्धेत रोप्य पदकाची कमाई केली. अशाप्रकारे राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत यश मिळवत निर्माण झालेल्या आत्मविश्वासावर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्यास नीरज तयार झाला.

2) आंतरराष्ट्रीय पातळीवरील कामगिरी 

आत्मविश्वासाच्या जोरावर नीरज यांनी 2014 साली बँकॉक येथे झालेल्या युवा ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत रोप्य पदक मिळविले. हे त्यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील पहिले पदक होते. पण त्यांच्या आंतरराष्ट्रीय करियरला 2016 मध्ये खऱ्या अर्थाने वळण मिळाले. 2016 मध्ये झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्यानंतर ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक गॅरी कॅल्व्हर्ट यांच्या हाताखाली प्रशिक्षण सुरू झाले.

त्यानंतर जुलै 2016 मध्ये झालेल्या IAAF वर्ल्ड U20 चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. पण काही कारणांनी त्याला 2016 साली ऑलिम्पिकसाठी पात्र होता आले नाही. याच कालावधीत त्यांना भारतीय सैन्यात नायब सुभेदार पदी नियुक्ती देण्यात आली. त्यानंतर 2017 आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले.

तसेच 2018 कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून भालाफेक खेळात पदक मिळविणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. त्याच वर्षी झालेल्या आशियाई स्पर्धेत भारतासाठी भालाफेक मधील पहिले सुवर्णपदक मिळविले. अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवीत ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न पाहत त्यादृष्टीने नीरजची वाटचाल चालू होती.

Visit our Blog : Networth Celebrity.Com

Neeraj Chopra Awards 

YearAward
2018अर्जुन पुरस्कार
2021मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार
2021विशिष्ट सेवा पदक
2022पद्मश्री पुरस्कार

नीरज चोप्रा यांना क्रीडा क्षेत्रातील विशेष योगदानासाठी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. भारत सरकारने 2018 मध्ये अर्जुन पुरस्कार देऊन गौरव केला. तसेच 2021 मध्ये भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. 2022 मध्ये भारत सरकारद्वारे पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान प्रदान करण्यात आला. तसेच भारतीय लष्कराने 2021 मध्ये विशिष्ट सेवा पदक देऊन नीरज चोप्रा यांचा गौरव केला. याशिवाय इतर खाजगी संस्थाकडून देखील नीरज चोप्रा यांचा सन्मान करण्यात आला आहे. (नीरज चोप्रा माहिती मराठी)

Neeraj Chopra Networth

नीरज चोप्रा हे 2021 च्या ऑलिम्पिक नंतर प्रसिद्धी झोतात आहे. काही संस्थाच्या अहवाला नुसार नीरज चोप्रा यांच्याजवळ 37 कोटी रुपयांची संपत्ती आहे. ऑलिम्पिक पदक मिळविल्यानंतर त्यांना मोठ्या रकमेची बक्षिसे मिळाली होती. तसेच  जाहिरात, प्रमोशन यातून ही त्यांची चांगली कमाई होते. ते विविध ब्रँडचे Ambassador आहेत.

  • XUV 700
  • MUSTANG
  • BMW
  • TATA

Conclusion

अशाप्रकारे नीरज चोप्रा माहिती मराठी ( Neeraj Chopra information in Marathi)  या लेखातून माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. माहिती आवडली असल्यास कंमेंट्स बॉक्स मध्ये नक्की प्रतिक्रिया द्या आणि तुम्हाला कोणत्या व्यक्तीबाबत जाणून घेण्यास आवडेल ते ही कळवा.  ची टीम तुमच्या सूचनावर नक्की काम करेल. तसेच  च्या कुटुंबात सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सहभागी व्हा….. धन्यवाद!!!

प्रश्न 1- नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

उत्तर – नीरज चोप्रा भालाफेक खेळाशी संबंधित आहे.

प्रश्न 2-  नीरज चोप्राला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार केव्हा देण्यात आला ?

उत्तर – नीरज चोप्राला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2021 मध्ये देण्यात आला.

प्रश्न 3- नीरज चोप्रा करोडपती आहे का? ( Neeraj chopra Networth)

उत्तर – हो.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top